बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या धास्तीन ड्रंक अँड ड्राईव्हची पोलीस कारवाई रद्द

मुंबई | कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यासह देशभरात दहशतीचे वातावरण आहे. हळूहळू कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाया रद्द करण्याच्या सूचना पोलीस महासंघचालकाच्या कार्यालयातून वाहतूक पोलीसांच्या युनिटला देण्यात आल्या आहेत.

कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने दक्षता म्हणून राज्यातील वाहतूक पोलीसांच्या युनिटला सूचना देण्यात आली आहे. ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करताना अल्कोहाल तपासण्याचं यंत्राचा वापर टाळण्यात यावा, अशा सूचना पोलीस महासंघचालचकाच्या कार्यालयातून देण्यात आली असल्याची माहिती समजत आहे.

कोरोना आजार हा सं संसर्गजन्य आजार असल्याने कोरोनाची लागण ड्युटीवर असलेल्या पोलिसांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पोलिसांनासुद्धा खबरदारी म्हणून आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांची संख्या 39 वर गेली आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक 9 आणि पुण्यात 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

अमेरिकेत कोरोनावरील पहिल्या लसीची चाचणी; लवकरच बाजारात होणार उपलब्ध

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंची राज्यसभेवर वर्णी

महत्त्वाच्या बातम्या-

संभाजीराजेंनी माजी लष्करप्रमुखांना सांगितला मराठ्यांचा गौरवशाली इतिहास; त्यावर ते म्हणाले मला तो फोटो द्या!

कोरोना रोखण्यासाठी ठाकरे सरकारने घेतेलले 11 मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर

“चंद्रकांतदादा जरा जपून बोला नाहीतर तुम्हाला तुमची उंची दाखवावी लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More