Top News पुणे महाराष्ट्र

गोल्डनमॅन सचिन शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

पुणे | पुणे-नगर रोडवरील लोणीकंद येथे सचिन नाना शिंदे या गोल्डनमॅन तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगाराची नुकतीच डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे नगर रोडवर एकच खळबळ उडाली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या प्रकरणी वेगानं तपासाला सुरुवात केली होती, अखेर या प्रकरणात पोलिसांना अवघ्या ४८ तासात मोठं यश मिळालं आहे.

सचिन नाना शिंदे लोणीकंद येथील एचडीएफशी बँकेच्या एटीएमजवळ मित्रांसोबत उभा असताना भगव्या दुचाकीवरुन दोघेजण तिथं आले होते. त्यातील एकाने सचिन शिंदेवर मागच्या बाजूनं गोळीबार केला होता. यामध्ये सचिनच्या डोक्याला गोळी लागली होती, त्यात त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हल्लेखोर पेरणे गावाच्या दिशेने पसार झाले होते.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अत्यंत वेगानं हालचाली करण्यात आल्या. स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम बनवून रवाना केल्या होत्या. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सचिन किसन शिंदे (वय-३२), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय-२०), रोशनकुमार समशेर साहू उर्फ गौंड (वय-२०) अशी अटक केलेल्यांची नावं आहेत.

गुन्ह्यात वापरलेलं हत्यार आरोपींकडून जप्त करण्यात आलं आहे. सदर गुन्हा आरोपींनी साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप तरी या हत्येमागचं कारण समजू शकलेलं नाही. पोलीस या कारणाचा शोध घेत आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘इथलेच काय इंटरनॅशनल डॉनही मला ओळखतात, घाबरायचं नाही’; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

शेतकऱ्याच्या पोराची कमाल, नोकरी सोडून घरच्या छतावर करून दाखवली केसरची शेती

तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, ‘त्या’ मंत्र्याचे फोटो व्हायरल!

“भगतसिंह कोश्यारी हे गोव्याचेही राज्यपाल, त्यांनी अधुनमधून गोवा सरकारचंही विमान वापरावं”

शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावं अन्यथा…- उदयनराजे भोसले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या