बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाद तिरंगा रॅलीचा; सरकार आणि एमआयएममध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता

मुंबई | राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर काही प्रमाणात निर्बंध कायम आहेत. अशातच ओमिक्राॅनच्या (Omicron) वाढत्या प्रभावामुळं सरकार चिंतेत आहे. परिणामी मोठ्या शहरांमध्ये गर्दी टाळण्याची विनंती प्रशासन करत आहे. एमआयएमनं (AIMIM) आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईकडे आगेकूच केली होती. परिणामी सध्या सरकार आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उभा राहण्याची चिन्हं आहेत.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल (MP Imtiaz Jalil) यांनी सरकार मुस्लीम आरक्षणाबाबत गंभीर नाही, अशी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी वक्फ बोर्ड आणि मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये तीरंगा पदयात्रा काढण्याची घोषणा केली होती. या पदयात्रेसाठी निघालेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांना मालेगावात स्थानबद्ध करण्यात आलं आहे.

एमआयएमचे आमदार फारूख शाह (MLA Farukh Shaha) आणि उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष खालिद परवेझ यांच्यासह 50 कार्यकर्त्यांना मालेगावात अडवण्यात आलं आहे. एमआयएमच्या तिरंगा पदयात्रेच्या पार्श्वभूमिवर मुंबईमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. एमआयएमच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचे आदेश पोलीस प्रशासनानं दिलं आहेत.

दरम्यान, राज्य सरकारनं परवानगी नाकारली तरी आम्ही पदयात्रा आणि सभा घेणारच असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल म्हणाले आहेत. परिणामी सरकार आणि एमआयएममध्ये संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत.

थोडक्यात बातम्या 

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी एका क्लिकवर

भारती म्हणते, ‘Are We Positive?’; व्हिडीओ शेअर करत दिली गुड न्यूज

“…तर आपल्यालाच सरकारी पाहुणे बनावे लागेल”, नवाब मलिकांना खोचक टोला

“जास्त हवेत उडायचं नसतं, मलिकांनी स्वतःची प्रतिमा भंगारात मिसळली”

भाजपने नितेश राणेंच्या खांद्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More