बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आंदोलनकर्त्यांच्या घरातील महिलांशी पोलिस अश्लील बोलत आहेत; राजू शेट्टींचा आरोप

मुंबई | आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी अत्यंत खालची पातळी गाठली आहे. आंदोलनकर्त्यांच्या घरातील महिलांशी पोलिस अश्लील भाषेत बोलत आहेत, असा अारोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींनी केला आहे.

राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले?

“आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आई-वडिलांना त्रास देणं, त्यांना ताब्यात घेणं, अरेरावीची भाषा वापरणं, दमदाटी करणं, कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी घरात असलेल्या महिलांशी अश्लील भाषेत बोलणं, अशा प्रकारची पातळी पोलिसांनी गाठली आहे. ज्यांचा आंदोलनाशी संबंध नसताना पकडणं हे बेकायदेशीर आहे आणि अशा प्रकारचं कृत्य करताना पोलिस दिसत आहेत. तुम्हाला सूड घ्यायचा असेल तर घ्या, आम्ही आता आंदोलन आणखी तीव्र करणार असून रस्त्यावर जनावरं आणून महामार्ग रोखणार आहोत.”

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजप आणि संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत- शशी थरूर

-दूध आंदोलनाकडे हार्दिकने फिरवली पाठ; राजू शेट्टींना रस्त्यावर खुर्ची टाकून बसण्याची वेळ!

-सांगलीत पोलिसाला 18 वेळा भोसकलं, घटना सीसीटीव्हीत कैद

-दूध दरवाढीवरुन नगरच्या शेतकऱ्यानं महादेव जानकरांना शिव्या दिल्या!

-भाजप दहा तोंडी रावण आहे; विद्या चव्हाण यांचा भाजपवर हल्लाबोल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More