बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तलवारीने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयला पोलिसांनी दिलं आयुष्यभर लक्षात राहिल असं गिफ्ट!

औरगांबाद | बर्थडेला तलवारीने केक (Cake) कापल्याप्रकरणी याआधीही अनेकांवर कारवाई झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र तरीही लोक काही सुधारायचं नाव घेताना दिसत नाहीत. आता औरगांबादमधून (Aurangabad) अशीच एक घटना समोर आली आहे. तलवारीने केक कापल्याने पोलिसांनी तरूणाला वाढदिवसादिवशीच जन्मभर लक्षात राहील असं गिफ्ट दिलं आहे.

औंरगाबाद येथील जुना मोंढा परिसरात ही घटना घडली आहे. हर्षद रोहीदास गोरमे असं अटक करण्यात आलेल्या तरूणाचं नाव आहे. 22 इंची धारधार तलवारीने हा तरूण केक कापत होता. मित्रांनी केक कापतानााचा व्हिडीओ स्टेटसला ठेवल्याने हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला त्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांनी शस्त्रबंदी कायद्यानुसार ही अटक केली आहे. धारधार शस्त्र बाळगल्याने हर्षद याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हर्षद याने 5 डिसेंबरला तलवारीने केक कापला होता. त्यानंतर त्याच्या मित्रांनी याचा व्हिडीओ काढून स्टेटसला ठेवला होता. स्टेटसला ठेवल्याने हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी हर्षदचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

दरम्यान, याआधीही अनेकवेळा अशा घटना घडल्या आहेत. पोलिसांनी वारंवार कारवाई करूनही अनेक तरूण धारधार शस्त्राचा वापर करून केक कापताना दिसतात. शिवाय त्यानंतर केक कापतानाचा व्हिडीओ काढून तो व्हायरल देखील करतात. त्यामुळे अशा घटना कमी होण्याऐवजी अधिकच प्रोत्साहन मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ कारणामुळे कतरिना कैफ आणि विकी कौशल विरोधात तक्रार दाखल

महाराष्ट्रात कोरोना खरंच वाढतोय का?, जाणून घ्या आजची आकडेवारी

“शिवसेना म्हणजे डबल ढोलकी”, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

शेकोट्या पेटल्या! ‘या’ तारखेनंतर थंडी आणखी वाढण्याची शक्यता

“…तर OBC आरक्षण परत मिळू शकतं”, फडणवीसांनी सांगितला फाॅर्म्युला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More