महाराष्ट्र मुंबई

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच जणांना अटक

Loading...

मुंबई | गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अभियंता अनंत करमुसे यांना मारहाण झाल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

भाजपने आव्हाड यांनाही या प्रकरणात आरोपी केलं जावं तसेच संबंधित सुरक्षा रक्षक पोलिसांचं निलंबन करण्यात यावं, अशी मागणी केली आहे. मात्र या प्रकरणी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या पाचही जणांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

विरोधी पक्षात असलेल्या भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याच्या आवारात ठाण्यातील अभियंत्याला झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये मुंबई पोलीस दलातील तीन पोलिसांचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची कोरोना टेस्ट; आला हा रिपोर्ट

राज्यातील मंत्र्यांमध्ये समन्वय दिसत नाही- देवेंद्र फडणवीस

महत्वाच्या बातम्या-

आमदारांच्या वेतनातील 30 टक्के कपातीला ठाकरे सरकारची मंजुरी

‘भीकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर’; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

कोरोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवा अन्…- शोएब अख्तर

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या