नवी दिल्ली | सध्या युट्यूब वर प्रँक व्हिडीओ, सेक्सबाबत महिलांनी नको ते प्रश्न विचारणे हा ट्रेंडच चालू झाल्यासारखं आहे. रस्त्यावर मुलींना, महिलांना असे फालतू प्रश्न विचारून मनोरजंन करणं आणि प्रसिद्धी मिळवणं हे त्याचं उदिष्ट. मात्र ग्रेटर चेन्नई पोलिसांनी ‘चेन्नई टॉक्स’ नावाचं युट्यूब चॅनल चालवणाऱ्या तिघांना अटक केली आहे.
एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चेन्नई टॉक्ससोबत बातचीत करतानाचा एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये ती महिला लैंगिक संभोग, लैंगिकता अशा विषयांवर बोलली आहे. व्हिडीओमध्ये तरूणी बिंदास्तपणे बोलली आहे.
हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून संंबंधित तरूणीला नेटकऱ्यांनी शिवीगाळ केली आहे. कारण ‘शो’ स्क्रिप्टेड होता आणि व्हिडीओवरील कमेंट डिसेबल केल्या जातील असं चॅनलकडून सांगण्यात आलं होतं. मात्र युट्यूब या व्हिडीओवर कमेंट डिसेबल नसल्याचं समजल्यावर मला धक्का बसला असं तरूणीने तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, चॅनलचा मालक दिनेश, व्हिडिओ जर्नलिस्ट अजय बाबू आणि VJ असेन या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची उपकरणंही जप्त केली आहेत.
பெசன்ட் நகர் கடற்கரையில் Prank show என்ற பெயரில் பெண்களை ஆபாசமாக பேச வைத்து வீடியோ பதிவு செய்து வெளியிட்டு வந்த YouTube channel ன் உரிமையாளர்,தொகுப்பாளர் மற்றும் கேமராமேன் ஆகிய மூன்று நபர்களும் கைது செய்யப்பட்டு சிறையில் அடைக்கப்பட்டனர். pic.twitter.com/35UET3hCDU
— DCP Adyar (@DCP_Adyar) January 12, 2021
थोडक्यात बातम्या-
Freedom 251 मोबाईल आठवतो का?, त्याच्या मालकाला नव्या घोटाळ्यात अटक
“कृषी कायद्यांना स्थगिती देऊन लक्ष्मण रेषा ओलांडली, कोर्टाला अचानक एवढी तत्परता आली कोठून?”
“माझ्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत…”; रामदास आठवले यांनी घेतली नवी शपथ!
“बर्ड फ्लूमुळं व्यावसायिकांचं नुकसान, कोंबड्यांच्या आयात निर्यातीवर बंदी घालू नका”
कोरोना लसीकरणाची मोहिम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार!