मुंबई | ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न फिल्म बनवणाऱ्या एका टोळक्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लाखो सबस्क्राईबर्सला खराखुरा पॉर्न कन्टेंट विकून कोट्यवधींची माया कमावणारी ही टोळी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मूव्हीचं शूटिंग सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकून त्यावर कारवाई केली आहे.
दरमहा 199 रुपये घेऊन अशा टोळ्या लोकांना सभासदत्व देतात आणि सभासद झालेल्या लोकांना ॲपच्या माध्यमातून लाईव्ह पॉर्न विक्री करतात. मुंबईच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी 7 जणांना अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांना अशा प्रकारे अश्लील व्हिडिओ प्रसिद्ध करणाऱ्या 12 ॲप्सबद्दल माहिती मिळाली आहे.
अटकेत असलेले आरोपी हे आम्ही फक्त एका लव्ह-स्टोरीचं शूटिंग करत होतो, असं सांगत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना या ठिकाणी स्क्रिप्ट, डायलॉग सापडले आहेत ज्यामध्ये हे सिद्ध होतं, की तिकडे अश्लील व्हिडिओ बनवण्याचं काम सुरू होतं. संबंधित लोकांची सखोल चौकशी करून अशा प्रकारे काम करणाऱ्या आणखी लोकांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येणार आहे.
सध्या ऑनलाईन वेब सीरिज पाहण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि मोठ्या प्रमाणात युवावर्ग त्याकडे आकर्षित झालेला दिसून येतो. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाईल देताना आता विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
थोडक्यात बातम्या-
मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचली महिला, खरा प्रकार पाहून पोलीसही चक्रावले
वारकरी बाहेर पडले तर सरकारच्या अंगलट येईल, ‘या’ महाराजांनी दिला इशारा
मी वाईट माणूस नाहीये रे…. अभिनेत्रीच्या आरोपावर दिग्दर्शकाचं भावनिक स्पष्टीकरण
संजय राठोड शक्तिप्रदर्शन करणार?, इतक्या हजार लोकांची गर्दी होण्याची शक्यता
पूजा चव्हाण प्रकरणात नवा मेसेज व्हायरल, संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता