Top News देश

घरकाम करणाऱ्या तरूणीसोबत पोलीस अधिकाऱ्याने केलं हे धक्कादायक कृत्य

नवी दिल्ली | पटनामधील बिहार येथे एका क्षुल्लक कारणावरुन घरकाम करणाऱ्या मुलीला एका पोलीस अधिकाऱ्याने चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संंबंधित पोलिसाने त्याच्या पत्नीसोबत मिळून गरम सळीचे चटके तरूणीला  दिले आहेत.

नितेश चौधरी असं पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. पुर्णिया जिह्यालीतील गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक नितेश चौधरी यांच्याकडे दोन वर्षांपासून तरुणी घरकाम करत होती. त्यांना दोन वर्षांची एक लहान मुलगी आहे. त्या लहान मुलीने खेळताना घरभर माती टाकली होती. त्यावेळी घरकाम करणारी पीडित तरूणी त्या लहान मुलीला ओरडली.

तरूणी आपल्या मुलीला ओरडल्याचा राग नितेश चौधरी आणि त्यांच्या पत्नीला आला. याच रागाच्या भरात त्यांनी तिला मारहाण केली. इतकंच नाही तर तिला लोखंडाच्या गरम सळीने तिच्या गालावर, गळयावर आणि दोन्ही हातांवर चटके दिले. या घडलेल्या घटनेनंतर दोन दिवसांनी पीडित मुलगी घरातून पळून गेली. त्यानंतर तिने भट्टा बाजारात एका माणसाला तिने संपुर्ण प्रकार सांगितला. त्या माणसाने तातडीने तिची मदत करत चाईल्ड लाईनशी संर्पक साधला.

दरम्यान, तरूणीने तिला घरात बंद करुन मारहाण केल्याचा आरोपसुद्धा केला आहे. संबंधित तरूणीला तिच्या काकांनी नितेश चौधरींच्या घरी ठेवलं होतं.

थोडक्यात बातम्या-

तो मरता मरता वाचला, म्हणतो टाटानेच केला चमत्कार!

“माझी सत्ता, माझी मनमानी असा राज्य सरकारचा कारभार चाललाय”

टिकटाॅक युजर्ससाठी खूशखबर, भारतात टिकटाॅक पुन्हा होणार सुरू??

…मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते उद्धव ठाकरेंना कळेल- देवेंद्र फडणवीस

शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या