बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भर रस्त्यावर 8 वर्षाच्या मुलीसमोर पोलिसाने कानशिलात लगावली; पाहा व्हिडीओ

हैदराबाद | सोशल मीडियाच्या (Social Media) आजच्या जमान्यात जगात कुठेही काहीही घडलं तरी लगेच गोष्ट व्हायरल (Viral) होत आहे. कधी सकारात्मक (Positive) तर कधी नकारात्मक (Negative) गोष्टी व्हायरल होतात. परिणामी सोशल मीडिया एक महत्त्वाचं साधन बनलं आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर एक पोलिसांच्या (Police) अरेरावीचा व्हिडीओ (Video) प्रचंड व्हायरल होत आहे.

तेलंगणामधील (Telangana) एका व्हिडीओत तरूणामध्ये आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये चांगलीच बाचाबाची होत असल्याचं लक्षात येतं. व्हिडीओमध्ये व्यक्तीनं आरोप केला आहे की त्याच्यावर महेबूबनगरमधील एका पोलीस अधिकाऱ्यानं मारहाण केली आहे. पोलीस अधिकाऱ्यानं त्या व्यक्तीला आठ वर्षाच्या मुलीसमोर कानशिलात लागवली आहे. परिणामी सध्या सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सदर घटना ही भर रस्त्यावर घडली आहे. श्रीनिवास नावाचा व्यक्ती आपल्या आठ वर्षांच्या मुलीसह बाजारात जात होता. त्यानं हेल्मेट घातले नसल्यानं त्याला संबंधित अधिकाऱ्यानं आडवलं. श्रीनिवासच्या मुलीच्या समोर पोलीस अधिकाऱ्यानं त्याला कानाखाली मारली त्यानं विरोध केला आणि जाब विचारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तेलगू भाषेतील या व्हिडीओमध्ये मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव सर्वकाही सांगून जात आहेत.

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या 

“सुशांत तुझी आज आठवण येते”; सारा अली खानने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

मोदी सरकारची भन्नाट योजना, मुलगी 21 वर्षांची झाल्यावर मिळतील 15 लाख

अनिल देशमुख प्रकरणी सीताराम कुंटेंची 6 तास चौकशी; वाचा नेमकं काय झालं?

“हेच का तुमचे संस्कार?”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले, “मी त्यांना सांगितलंय की, काँग्रेसशिवाय…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More