बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोलिसाची शेतकऱ्याला शेतात जाऊन बेदम मारहाण, पाहा व्हायरल व्हिडीओ

लातूर | आजकाल सोशल मिडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं आपण पाहत असतो. असाच एक मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना पाहायला मिळत आहे. यामध्ये एक पोलिस कर्मचारी शेतकऱ्याला बेदम मारहाण करत असल्याचं दिसुन येत आहे.

लातूरच्या देवणी तालुक्यातील चवनहिप्परगा गावातील हा व्हिडीओ असल्याचं समोर आलं आहे. चवनहिप्परगा गावातील शेतकरी गंगाधर कोतवाड यांचं शेतीच्या बांधावरून शेजारी असलेल्या शेतमालकाशी भांडण झालं. त्यानंतर तिथे पोलिस कर्मचारी रमेश कांबळे पोहचले.

पोलिस कर्मचारी रमेश कांबळे यांनी एकाचीच बाजू ऐकुन घेतली आणि गंगाधर याला त्याच्याच शेतात काठीने आणि लाथाबुक्यांनी अमानुष मारहाण केली असा आरोप गंगाधरने केला आहे. दरम्यान, कारण काहीही असो पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करणाऱ्यांनीच जर असं वागायला सुरूवात केली आणि कायद्याचे रक्षकच जर भक्षक बनु लागले तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याचं बोललं जात आहे.

संबंधित व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पोलिस कर्मचारी त्या शेतकऱ्याला कशी अमानुष मारहाण करत आहे. या प्रकरणात रमेश कांबळे या पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी गंगाधर यांनी केली आहे. परंतु, आता दिवसाढवळ्या कायदा हातात घेणाऱ्या या पोलिसावर कारवाई होणार की, फक्त अंतर्गत चौकशी होऊन त्यांना क्लिन चिट मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या

कोरोना लसीसंदर्भात गुडन्यूज, सरकारनं घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, ‘या’ वयोगटात कोरोना रुग्णांची धक्कादायक वाढ

महाविकास आघाडी सरकारचा छत्रपती उदयनराजे भोसले यांना मोठा दणका

धक्कादायक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग; आरोग्य यंत्रणेची कबुली

2 दिवसांत चक्क 4 टन आंब्याची आगाऊ नोंदणी; शेतकरी डॉ. केशव सरगर यांनी लढवली ‘ही’ शक्कल

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More