राज्यातील पोलीस भरतीबाबत देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा!

Police Bharti 2024 | राज्यात सध्या पोलिस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, पावसामुळे या भरती प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे नांदेड आणि अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. यानंतर आता गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी माहिती दिली आहे.

राज्यामध्ये सध्या ज्या भागात पाऊस सुरू आहे, तेथील पोलीस भरती स्थगित करण्यात आली असून येथील पोलीस भरती पुन्हा राबवण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांनी आज  सर्व स्थितीचा आढावा घेत मोठी घोषणा केली.

नांदेड आणि अमरावती येथील भरती पावसामुळे रद्द

“पाऊस पुढे वाढणार आहे, आचारसंहिता लागेल. त्यामुळे चाचणी पुढे गेली तर मुलांचे वय निघून जाईल.सेकंड चान्स मिळत नाही.”, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. यासोबतच ज्या ठिकाणी पाऊस नाही, तिथे चाचण्या सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

नांदेड पोलीस दलातील कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया ही 19 जूनपासून सुरू झाली आहे. 134 जागेसाठी तब्बल 15 हजार 200 अर्ज आले आहेत. आज मैदानी चाचणी होणार होती, पण पाऊस (Police Bharti 2024 ) पडत असल्याने चाचणी घेण्यात अडथळा निर्माण झाला. आज ज्यांची चाचणी होती त्यांना पुढील तारीख देण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती ही नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर टाकली जाईल.

भरतीसाठी लाखो उमेदवार

दरम्यान, राज्यात एकूण 17 हजार 471 जागांसाठी तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. बँड्समन पदाच्या 41 जागा, तुरुंग विभागात शिपाई पदाची जागा, चालक पदाच्या 1686 जागा, पोलीस शिपाई पदाच्या 9595 जागा तर शीघ्र कृती दलासाठी 4 हजार 349 जागांसाठी बरेच अर्ज करण्यात आले आहेत. (Police Bharti 2024 ) मात्र, पावसामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलावी लागली आहे.

News Title – Police Bharti 2024 Devendra Fadnavis Big announcement

महत्त्वाच्या बातम्या-

पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम करेल मालमाल; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई

“माझ्या शरिरावर टॅग, शिवाय त्या रात्री झोपायला…”, करिश्मा कपूरने केला गौप्यस्फोट

मोठी बातमी! लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली

सानिया मिर्झा दुसऱ्यांदा लग्न करणार?; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

सानिया मिर्झाचा एक्स नवरा शोएब मलिकने केली मोठी घोषणा; म्हणाला, “पुन्हा एकदा..”