बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हम लाॅकडाऊन का पालन करेंगे” सकाळी व्यायामासाठी निघालेल्या लोकांचा पोलिसांनी काढला घाम

नवी दिल्ली | देशात कोरोनाने सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. वर्षाच्या सुरूवातीला कुठे लोकांना कोरोनाची भिती कमी झाल्याचं भासलं, तेवढ्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलं. मागील वर्षापेक्षा सध्या कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली असून मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यु होत आहे. या कारणामुळे देशात अनेक राज्यांमध्ये लाॅकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. मात्र अनेक लोक याचं पालन करत नाहीत. अशातच सकाळी व्यायामासाठी निघालेल्या लोकांचा पोलिसांनी चांगलाच घाम काढला आहे.

संबंधित घटना ही हरियाणामधील अंबाला येथील आहे. हरियाणा सरकारने राज्यात 3 मे पासून एक आठवड्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली आहे. तरी देखील लोक काहीही कारणं काढून घराबाहेर पडत आहेत. सकाळी- सकाळी व्यायाम करण्याचे कारण सांगून बाहेर पडलेल्या लोकांचा पोलिसांनी चांगलाच घाम काढला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जलद गतीने पसरत आहे.

सकाळी बाहेर पडलेल्या या लोकांना पोलिसांनी उठा-बशा काढण्यास लावल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये उठा-बशा काढणारे लोक “हम लाॅकडाऊन का पालन करेंगे”, असं देखील म्हणत आहेत. त्यानंतर अखेर पोलिसांनी त्यांना चेतावणी देऊन सोडलं.

दरम्यान, हरियाणाचे भाजपचे मंत्री अनिल विज यांनी ट्वीटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. यापूर्वी कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या वाढत असल्याने ग्रुरुग्रामसह हरियाणाच्या 9 जिल्ह्यात 30 एप्रिल रोजी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. हा विकेंड लॉकडाऊन शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून सोमवारी सकाळपर्यंत राहणार आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या- 

नियतीने किती निष्ठूर व्हावं? मुलीनं काढलं चित्र, मात्र पहायला आता बापच राहिला नाही!

पुणे हादरलं! चक्क गुंडाने केली पोलीस हवालदाराची हत्या

“घरावर दरोडा घालून माझ्या 2 गाड्या चोरल्या”; परमबीर सिंह आणि प्रदीप शर्मावर गंभीर आरोप

केंद्र सरकारची मोठी घोषणा; राज्यातील कोरोना योद्ध्यांना पुन्हा मिळणार 50 लाखांचं विमा संरक्षण

मराठा आरक्षणाच्या निकालाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलवली तातडीची बैठक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More