महाराष्ट्र सोलापूर

जमीन विक्री प्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल

पंढरपूर | जगदंबा सूत गिरणी जमीन विक्री प्रकरणी राष्ट्रवादीचे दोन बडे नेते अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादीचे माजी खासदार संदिपान थोरात यांच्यासह विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी याप्रकरणी माढा न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना आदेश दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. 

या प्रकरणात बबनराव शिंदे यांचा मुलगा रणजित शिंदे याचा देखील समावेश आहे. तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने याप्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या –

-पीक कर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

-काय सांगता??? मोबाईलमध्ये रेंज नसली तरीही करता येणार फोन!

-दमानिया-खडसे वाद पुन्हा पेटला; खडसेंनी उचललं पुढचं पाऊल!

-भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाच्या संशयाची सुई मुंबई-पुण्यात?

-मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची समज नाही!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या