मुंबई | निलेश साबळे, भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या तिन्ही कलाकारांविरोधात संभाजी ब्रिगेडने पोलिसात तक्रार दिली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी शो मधून हे कलाकार घराघरात पोहचले आहेत. मात्र या तिघांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सोलापुरात त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही कलाकारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड या महापुरुषांची नक्कल करुन विनोद केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. याच प्रकरणी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी निलेश साबळेंनी माफी मागावी असं म्हटलं होतं.
दरम्यान, निलेश साबळे यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत दिलगिरी व्यक्त केली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“सर्व बोर्डाच्या परीक्षा व विद्यापीठाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील”
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता शहरातले मॉल्स देखील बंद राहणार!
महत्वाच्या बातम्या-
“विधान परिषेदसाठी माझी तयारी…फक्त पाटलांच्या निर्णयाची वाट पाहतोय”
“हा निर्णय म्हणजे आमचे हातपाय तोडले आणि आता पळायला सांगताय”
महापालिका निवडणुका पुढे ढकलणार?; मुख्यमंत्री म्हणतात…
Comments are closed.