रायगड | छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीवर चढून फोटो काढल्यामुळे अभिनेता रितेश देशमुखच्या अडचणी वाढल्या आहेत. यासंदर्भात महाड पोलिसात आॅनलाईन तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अभिनेता रितेश देशमुख, रवी जाधव, विश्वास पाटील आणि अन्य मंडळींनी रायगडावरील शिवरायाच्या मेघडंबरीवर बसून फोटोसेशन केलं होतं. त्यामुळे शिवभक्तांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
दरम्यान, या प्रकारानंतर रितेशने ट्विटवरून शिवप्रेमींची जाहीर माफी मागीतली होती. मात्र तरीही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-हत्या प्रकरणातील आरोपींचा भाजपच्या केंद्रीय मंत्र्यानं केला सत्कार
-वेळ आली तर गनिमी काव्याने आंदोलन करु- राजू शेट्टी
-महादेव जानकर यांचं मंत्रिपद जाणार? काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
-भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना शरम वाटली पाहिजे- शरद पवार
-शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात इंग्लंडचा विजय