औरंगाबाद महाराष्ट्र

‘तुम्ही आम्हाला अडवलं का?’; औरंगाबादमध्ये दुचाकीस्वारांकडून पोलिसांना मारहाण

Loading...

औरंगाबाद | लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस प्रयत्नशील असून ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र पोलिसांना काही ठिकाणी नागरिकांच्या बेशिस्त वर्तनाला सामोरं जावं लागत आहे.

औरंगाबादमध्ये लॉकडाउनमध्ये अडवल्याने पोलिसांना लाठीने मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. दिल्ली गेटजवळील अण्णा भाऊ साठे चौकात पोलिसांना नाकाबंदी लावली होती. यावेळी एका दुचाकीवरुन तिघेजण प्रवास करत असल्याचं पोलिसांना दिसलं. त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पण दुचाकीस्वार पळून जाण्यात यशस्वी ठरले.

पोलिसांनी अडवल्याचा राग मनात असल्याने काही वेळाने तरुण आपल्या मित्रांना घेऊन तिथे पोहोचले आणि वाद घालण्यास सुरुवात केली. आम्हाला अडवलं का? असा जाब तरुण पोलिसांना विचारत होते. यावेळी वाद वाढला आणि एका तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याच्या हातातील लाठी खेचून घेत मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, जीव धोक्यात घालून रस्यावर बंदोबस्तासाठी उभ्या पोलिसांवर अशा पद्धतीने हल्ला करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवा अन्…- शोएब अख्तर

‘रामायण’ मालिकेत सुग्रीवची भूमिका साकारणारे श्याम सुंदर काळाच्या पडद्याआड

महत्वाच्या बातम्या-

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच जणांना अटक

आमदारांच्या वेतनातील 30 टक्के कपातीला ठाकरे सरकारची मंजुरी

‘भीकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर’; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या