लालूंच्या सुरक्षा रक्षकांनी पळवल्या गाद्या आणि उशा; रुग्णालयाची पोलिसांत धाव
रांची | बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना झारखंडच्या रिम्स रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं. लालूंच्या सुरक्षा रक्षकांनी रुग्णालयातील उशा आणि गाद्या पळवल्याचं समोर आलं आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत उशा परत करण्याच्या सूचना केल्या आहेत.
काही दिवसांपुर्वी लालूप्रसाद यादव यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना झारखंडच्या रिम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यांच्या सुरक्षेसाठी रूग्णालयात 10 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. या दरम्यान, तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांनी चक्क रूग्णालयातील उश्या आणि गाद्या पळवल्या होत्या. या घटनेनंतर रूग्णालय प्रशासनने थेट झारखंड पोलिसांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली.
लालूप्रसाद यादव जेव्हा रूग्णालयात होते तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी 10 पोलीस सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. त्यांना गाद्या, उशा देण्यात आल्या होत्या. पण ते आता परत करत नाहीत. यामुळे रिम्स रुग्णालयाला समस्यांचा सामना करावा लागत आहे, असं या पत्रात लिहिण्यात आलं आहे. त्यानंतर रांंचीच्या एसएसपींनी कारवाई करत सामान परत करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षकांना 24 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
दरम्यान, लालूप्रसाद यादव सध्या चारा घोटाळ्यामध्ये शिक्षा भोगत आहे. त्यांना निमोनिया झाल्यानंतर त्यांना रूग्णालयात हलवण्यात आलं होतं. तर त्यानंतर त्यांना एम्समध्ये हलवण्याचा सल्ला देण्यात आला होता.
थोडक्यात बातम्या-
देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजाचा घात केलाय- नाना पटोले
‘मेल्यावर साहेबांना काय सांगू?’; ‘या’ शिवसेना नेत्याचा उद्धव ठाकरेंना सवाल
“…तर महाराष्ट्राची जनता काय आदर्श घेणार?, विरोधकांनी विचार करायला हवा”
राज्यातील कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारीही देखील अत्यंत धक्कादायक
मनसुख हिरेन यांची हत्या करुन मृतदेह खाडीत फेकला- देवेंद्र फडणवीस
Comments are closed.