महाराष्ट्र मुंबई

धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचं पोलीस आयुक्तांना पत्र

मुंबई | गायिका रेणू शर्मा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, ओशिवरा पोलिसांनी आपली लेखी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोप रेणू शर्मा यांनी केला आहे.

रेणू शर्मा यांनी पोलीस आयुक्तांच्या नावे एक पत्र लिहिलं असून त्याची प्रत राज्यपालांनाही पाठवली आहे. या पत्रात त्यांनी मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून माझी फसवणूक केली. माझ्यावर बलात्कार करून माझं शारीरिक शोषण केलं. त्यामुळे मला त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा आहे, असं शर्मा यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

माझी बहीण करुणा हिच्या घरी इंदोर येथे माझी ओळख झाली. करुणा आणि मुंडे या दोघांनीही 1998 मध्ये प्रेमविवाह केला होता. मात्र 2006 मध्ये माझी बहीण बाळंत झाल्यावर इंदोरला गेली होती. त्यावेळी मी घरीच एकटी होते. हे मुंडेंना माहीत होतं. तरीही ते घरी आले आणि माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर प्रत्येक दोनतीन दिवसांनी येऊन त्यांनी माझ्याशी संबंध प्रस्तापित केले, असं रेणू यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर नवाब मलिक म्हणाले…

“…तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही”

“मुख्यमंत्र्यांवर बंगले, तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप”

कोरोना विरोधातील लढाईत नरेंद्र मोदी यांचं काम जगात सर्वोत्तम- देवेंद्र फडणवीस

करुणासोबत सहमतीनं संबंधात; आम्हाला दोन मुलंही आहेत- धनंजय मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या