पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख, पोलिसांनी चक्क निवेदन नाकारलं!

जळगाव | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केल्यानं पाचोरा पोलीस स्टेशननं चक्क निवेदन नाकारलंय. पाचोरा तालुका काँग्रेस कमिटीनं हे निवेदन दिलं होतं.

नोटबंदीच्या निषेधार्थ पाचोऱ्याच्या शिवाजी चौकात काँग्रेसकडून निषेध सभेचं आयोजन करण्यात आलंय. पालिकेनं या कार्यक्रमाला परवानगीही दिलीय. मात्र पोलिसांना दिलेल्या निवेदनात मोदींचा एकेरी उल्लेख असल्यानं हे निवेदन नाकारत आहोत, असं पोलिसांनी लिहून दिलंय.

दरम्यान, आमच्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या तसेच त्यांना पप्पू म्हणून हिणवणाऱ्यांचा आम्ही का आदर करायचा?, असा सवाल काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड. अभय शरद पाटील यांनी ‘थोडक्यात’शी बोलताना विचारला.