बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई; अँटीजन चाचणीनंतर धक्कादायक माहिती समोर

पिंपरी-चिंचवड | पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतच होती. परंतु, हळूहळू आता रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. पण ब्लॅक फंगस या नव्या आजाराने आता डोकं वर काढलं असल्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यातच नागरिकही सकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात फिरायला बाहेर पडत असल्याचं दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सकाळी फिरायला बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत तब्बल 70 नागरिकांची रॅपिड अँटीजन टेस्ट केली. शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी केल्यानंतर 70 पैकी तब्बल 37 नागरिक कोरोनाबाधित असल्याचं आढळून आल्याने पोलिसही चक्रावले.

प्रशासनाकडून वारंवार लॉकडाऊनबाबत जनजागृती करूनही नागरिक नियमांचं पालन करत नसल्याने पोलिसांनी सकाळच्या वेळेला बाहेर पडत नागरिकांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम हाती घेतली. पिंपरी-चिंचवडमधील मोशी, भोसरी तसेच प्राधिकरण या भागातील नागरिक सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडले, तेव्हा एमआयडीसी भोसरी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत तब्बल 35 हजार रुपये दंड वसूल केला आहे.

लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 70 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच नागरिकांची कोरोना चाचणी देखील केली असता 70 पैकी 37 नागरिक कोरोनाबाधित असल्याचं आढळून आल्याने आणखी चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनही नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन करत आहे.

थोडक्यात बातम्या –

गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपी बंद करा- नवाब मलिक

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनामुक्तीचा दर 93 टक्यांवर, सक्रिय रूग्णसंख्याही घटली

विवाहीत गर्लफ्रेंडसोबत तरुणाची आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

चिमुकल्याला झोप यावी म्हणून डॉक्टरांनी गायलं सुंदर गाणं; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘…नाहीतर मेडिकल दुकानदार संपावर जाणार’, राज्य सरकारला दिला 5 दिवसांचा अल्टीमेटम!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More