लखनऊ | उत्तर प्रदेशमधील एका अनाथ महिलेचा मृत्यू झाल्याने तिच्यावर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले आहेत. या घटनेचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून सध्या अनेकजण भावनिक होत आहेत.
देशाता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन यशस्वी करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. देशावर आलेल्या या संकटात डॉक्टर आणि पोलीस महत्त्वाची भूमीका बजावत आहेत.
उत्तर प्रदेशच्या मेरठमधील जनपद सहारनपूर येथील किशनपूर गावात मिना नावाच्या एक महिलेची तब्येत ठिक नव्हती. ती अनाथ असल्यामुळे पोलिसांनी तिला गाडीतून रुग्णालयात नेऊन तिला दाखल केलं. दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी या महिलेवर अंत्यसंस्कार केले.
लॉकडाऊन दरम्यान पोलीस आपल्या ड्युटी व्यतिरिक्त अनेक सामाजिक कामं करतानाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोमधून माणुसकीचे दर्शन घडत आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
झारीतले शुक्राचार्य कोण आहे? म्हणत पंकजा मुंडे उसतोड कामगारांच्या प्रश्नावर आक्रमक
सांगली पॅटर्न; विनाकारण घराबाहेर पडाल तर कोलांटउड्या माराल…!
महत्वाच्या बातम्या-
“महाराष्ट्रात वेडवाकडं करण्याचा प्रयत्न कराल तर त्याचा भाऊ राज ठाकरे अन् गाठ मनसेशी आहे”
“सरपंच आणि पोलीस पाटलांना 25 लाखांचं विमा संरक्षण द्या”
उद्धव ठाकरे कधीही मंत्री नव्हते पण ते उत्तम प्रशासक- अशोक चव्हाण
Comments are closed.