पोलिसांच्या सहकार्यामुळे उदयनराजेंच्या सुटकेचा मार्ग मोकळा

सातारा | पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यामुळे उदयनराजेंच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. जर पोलीस कोठडीची मागणी केली असती तर उदयनराजेंना जामिनासाठी अर्ज करता आला नसता. 

दरम्यान, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना दुपारी कोर्टात हजर करण्यात येतं. मात्र उदयनराजेंचे तब्बल ५ हजार कार्यकर्ते जमा झाले होते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांना ११ वाजताच न्यायालयात हजर करण्यात आलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा