बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पहिल्या भेटीतच महिला काढायला लावायच्या कपडे, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

लखनऊ | लखनऊ येथे दोन महिला आणि तीन पुरुषांनी एक हनीट्रॅप रचला होता. त्यांच्या या रॅकेटचा लखनऊ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटमधील महिला स्वतः इतर पुरुषांना कपडे काढायला लावत. त्यानंतर खोटे पोलीस येऊन त्यांची वेगळीच भूमिका पार पाडत असे.

ह्या गँगमधील महिला सोशल मीडियावरुन पुरुषांना टार्गेट करत होत्या. आपल्या आजूबाजूच्या लोकांना फोन करुन गोड गोड बोलून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचं काम या महिला अगदी प्रोफेशनल पद्धतीने करत होत्या. त्यानंतर त्या पुरुषांना ठरलेल्या ठिकाणी बोलावून कपडे काढायला सांगायच्या. कपडे काढत असतानाच या गँग मधील पुरुष पोलिसांची वर्दी घालून त्या ठिकाणी पोचायचे.

गँगमधील बनावट पोलिस घटनास्थळी पोचल्यानंतर ते पुरुषांचे फोटो आणि व्हिडीओ बनवायचे. तसेच फोटो आणि व्हिडीओच्या मार्फत ही गँग जाळ्यात अडकलेल्या लोकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे लुटत होते. तसेच जर पैसे दिले नाहीत तर व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपी देत असे. या प्रकरणातील सगळ्या आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. तसेच त्यांना अटक देखील करण्यात आलं आहे.

दरम्यान, या गँगमध्ये एकूण 5 जणांचा समावेश आहे. संबंधित आरोपींपैकी बनावट पोलिसांची भूमिका साकरणाऱ्या आरोपींचे नावं पंकज गुप्ता, असुल सकसेना आणि अजीजुल हसन सिद्दीकी असं आहे. या सर्व आरोपींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं लखनऊ पोलिसांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी अन्…

चेपॅाकवर मुंबईच्या गोलंदाजांसमोर कोलकाताच्या फलंदाजांची परीक्षा

बंगाल निवडणूकीला नवं वळण; ममतांवर निवडणूक आयोगाची कारवाई

आता RT-PCR चाचणीत सापडेना कोरोना विषाणू; नव्या कोरोना स्ट्रेननं डाॅक्टराची वाढवली चिंता

महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं स्पष्ट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More