गावातल्या घरात पाणी पिलं नंतर…; दत्तात्रय गाडेबाबत गावकऱ्यांनी दिली धक्कादायक माहिती

Swargate case

Swargate Bus Stand Case | स्वारगेट (Swargate Bus Stand Case) बसस्टँडमध्ये (Bus Stand) शिवशाही बसमध्ये (Shivshahi Bus) तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दत्ता गाडे (Datta Gade) या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली आहे. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) याने थेट आपले गाव गाठल्याची माहिती समोर आली आहे.

सीसीटीव्ही तपासातून महत्त्वपूर्ण माहिती

सीसीटीव्ही (CCTV) तपासातून पोलिसांना यासंदर्भात काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यानुसार, पोलिसांची पथके आरोपी दत्ता गाडेच्या (Datta Gade) गुनाट (Gunat) या गावी पोहोचली आहेत. गुनाट (Gunat) हे गाव पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरूर (Shirur) तालुक्यात आहे. या गावात पोहोचलेल्या तपास पथकाला आरोपीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. याच गावातील एका घरात आरोपी शेवटचा दिसल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी गावात दिसल्याची माहिती

व्हिडिओमध्ये दिसत असलेले हेच ते घर आहे, जिथे आरोपी दत्ता गाडेला (Datta Gade) शेवटचे पाहिले गेले होते. इतकेच नाही, तर याच घरात आरोपीने पाणी देखील प्यायल्याची माहिती समोर आली आहे. पाणी पिल्यानंतर आरोपी या ठिकाणी काही काळ थांबला आणि त्यानंतर बेपत्ता झाला, अशी माहिती काही गावकऱ्यांनी दिली आहे. आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेची पथके आधीच रवाना झाली आहेत. यातील काही पथके आरोपीच्या गुनाट (Gunat) गावात थांबून आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आरोपीचा शोध घेत आहेत.

श्वानपथक आणि ड्रोनची मदत

पोलिसांच्या मदतीला श्वानपथक (Dog Squad) देखील आहे. या श्वानपथकाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्याचे काम पोलीस करत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. आरोपी दत्ता गाडेला (Datta Gade) पकडण्यासाठी पोलिसांनी ड्रोनची (Drone) देखील मदत घेतली आहे. (Swargate Bus Stand Case)

गुनाट (Gunat) गावाच्या आजूबाजूला असलेल्या उसाच्या शेतातही त्याचा शोध घेतला जात आहे. या शेतात तो लपला आहे का, हे पाहण्यासाठी ड्रोन (Drone) फिरवले जात आहेत. मात्र, अद्याप या नराधमाचा शोध लागलेला नाही.

Title : Police Intensify Search for Accused Datta Gade in Swargate Bus Stand Case

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .