बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांचा विरोध केला म्हणून पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

कर्नाल | कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचं अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत अनेकवेळा चर्चा देखील केली. मात्र या सर्व चर्चा विफल गेल्या. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. अशातच कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत हरियाणातील भाजपचे मोठे नेते उपस्थित राहणार होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विरोध करण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बैठकीबाहेर निदर्शने केली. त्यावेळी शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठचार्ज केला.

शेतकरी संघटनांनी याबैठकीचा विरोध करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पोलिसांनी कर्नालमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली. ग्रामीण भागातील सर्व रस्ते बंद करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं आणि मुख्यमंत्र्याचा विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्यात अनेक शेतकऱ्यांना गंभीर इजा झाल्या आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जमुळे आता देशातील राजकारण तापलेलं दिसत आहे. तर सर्व क्षेत्रातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. पुन्हा शेतकऱ्यांचं रक्त सांडलं. शरमेने भारताची मान खाली गेली, असं ट्विट करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निषेध व्यक्त केला आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थो़डक्यात बातम्या-

आता स्वस्त किंमतीत सोन्यात गुंतवणूक करा; केंद्र सरकारची मोठी योजना

तिसऱ्या कसोटीत भारताचा दारूण पराभव; इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज ढेर

‘…अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील’; तालिबानचं अफगाणी नागरिकांना नवं फर्मान

जिथं दिसेल तिथं संजय राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करू – निलेश राणे

राजनाथ सिंह यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा अमोल कोल्हेंनी घेतला समाचार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More