कोल्हापूर महाराष्ट्र सांगली

सांगलीच्या पोलीस हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

कोल्हापूर | पोलीस शिपाई समाधान मांटे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित झाकीर जमादार याला अटक करण्यात आली आहे. बुधवारी रात्री कोल्हापुरातून त्याला अटक करण्यात आली. 

सांगलीत एका हॉटेलमध्ये दारूच्या बिलावरून समाधान मांटेंची हत्या करण्यात आली होती. पोलीसाची हत्या झाल्याने पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी याबाबत तातडीने तपास करून संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, एलसीबीने खुनातील संशयित राजू नदाफ, अन्सार पठाण या दोघांना आधी अटक केली होती. आता या तिघांना सांगली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-कुत्र्यापाठोपाठ आता गायींच्या गळ्यातही सदाभाऊंच्या नावाच्या पाट्या!

-ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनी पार वाट लावली- राज ठाकरे

-डोंबिवलीचे रस्ते बनवताना खडीसोबत डांबराऐवजी साखर वापरली!

-दूध दरवाढ आंदोलन चिघळलं; कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड

-परळीत मराठ्यांचा रात्रभर ठिय्या; अजूनही आंदोलन सुरूच

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या