बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोलीस पतीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी डॉक्टर पत्नी सेवेवर; ‘मला थांबणं शक्य नाही…

मुंबई | कोरोनाने थैमान घातलं असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र कोरोनाने अनेक पोलिसांना आणि डॉक्टरांना आपलं शिकार केलं आहे. अशाच प्रकारे मुंबईतील पोलीस निरीक्षक झेवियर रेगो यांचं कोरोनाने निधन झालं. त्यांची पत्नी मनीषा रेगो या डॉक्टर आहेत.

मनीषा रेगा यांचे पती म्हणजेच झेवियर रेगो यांचा कोरोनाने मृत्यु झाल्यावर त्या खचल्या नाहीत ना डगमगल्या नाहीत. मनीषा या खासगी प्रसूती रूग्णालयात डॉक्टर म्हणून सेवा करतात. आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी आपलं काम चालू ठेवलं. त्यांनी आपला क्वारंटाईनचा कालावधी पुर्ण करत पुन्हा आपल्या सेवेवर रुजू झाल्या. आपल्या पतीच्या कार्याला त्यांनी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली दिली. कोरोनाच्या काळात त्यांची अहोरात्र सेवा चालू आहे.

मला थांबून चालणार नाही. माझ्यासारख्या अनेक डॉक्टरांची रूग्णांना गरज आहे. त्यातल्या त्यात गर्भवती महिलांना तर जास्तच आहे. जगावर आलेल्या संकटाचं भान ठेवत नागरिकांनी जबाबदारीने वागायला हवं. आजही काही नागरिक विना मास्कचे फिरताना दिसत आहेत. लवकरच हे दिवस जातील, असा विश्वासही मनीषा यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मनीषा रेगो यांचे पती झेवियर रेगो 1993 मध्ये मुंबईच्या पोलीस दलामध्ये दाखल झाले होते. एमपीएससीच्या परीक्षेत झेवियर हे महाराष्ट्रात चौैथे आले होते. कोरोना काळातही ते रस्त्यावर उतरून ते आपलं कर्तव्य बजावत होते. मात्र कोरोनाने त्यांचा घात केला.

थोडक्यात बातम्या- 

‘आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहराही आता उघड झाला’; भाजपच्या ‘या’ आमदाराची जहरी टीका

“जनता हेच सर्वात मोठं न्यायालय,आता ठोक मोर्चाचा न्यायपालिकेवर विश्वास राहिला नाही”

धक्कादायक! शिक्षक महिलेने डाॅक्टर पतीला दिल्या झोपेच्या गोळा, नंतर दिला शाॅक अन्…

पत्नीला आपल्या छोट्या भावासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन् पुढे झालं असं काही की…

…म्हणून 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण स्लो डाऊन; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More