बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनाकारण घराबाहेर फिरत होत्या मुली, पोलिसांनी अशी घडवली अद्दल, पाहा व्हिडीओ-

नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने सध्या हैदोस घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अनेक राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र लॉकडाऊनचे नियम मोडत काहीजन विणाकारण बाहेर फिरतात दिसत आहेत. बाहेर विनाकारण पडणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतातच मात्र अशोका नगरमध्ये मुली विनाकारण बाहेर पडल्याचं दिसून आलं आहे.

पोलीस आपल्याला शिक्षा करणार नाहीत असं मुलींना वाटलं मात्र तसं न होता पोलिसांनी संबंधित मुलींना कोंबडा करायला लावून उठाबशा काढायला लावल्या. याबाबतचा व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे. . चंदेरी जिल्हा भागात हा प्रकार घडला.

महिला पोलीस सब इन्स्पेक्टरने या मुलींना तेथेच शिक्षा दिली. त्यांना उठा-बशा काढायला लावल्या आणि त्यांना कोंबडाही करायला लावला. या जिल्ह्यात 144 आणि कोरोना कर्फ्यू लागू केल्यानंतरही लोक रस्त्यावर उतरत आहेत.

दरम्यान, कोरोना इतकी भीषण परिस्थिता बाहेर असताना नागरिक विनाकारण बाहेर फिरतातच का?, कोरोना झाल्यावर त्याचा फटका आपल्याला आणि कुटुंबियांना बसू शकतो याचं भान प्रत्येकाने ठेवायला हवं. आपल्याला वाटतो तितका कोरोना साधा नाही, या कोरोनाने अनेक कुटुंबच्या कुटुंब खाल्ली आहेत. त्यामुळे घरी रहा सुरक्षित रहा असं आवाहन सर्व नागरिकांना प्रशासन करत आहे.

थोडक्यात बातम्या-  

न्यूज इंडस्ट्रीला मोठा धक्का! रोहित सरदाना यांच्यानंतर लोकप्रिय महिला ॲंकरचं निधन

बिहारचा बाहुबली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद शहाबुद्दीनचं कोरोनाने निधन

लेक असावी तर अशी!, भारतीय संघातील ‘या’ खेळाडूच्या प्रेयसीकडून वडिलांना यकृत दान

मराठी पाऊल पडते पुढे… आदिवासी तरुणाच्या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक

धक्कादायक! तरुणीचा पाठलाग करुन भररसत्यात फाडले तिचे कपडे अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More