मुंबई | कल्याणमधील चस्का कॅफेवर कल्याण गुन्हे अन्वशेषण शाखेच्या पोलिसांनी रात्री छापा टाकला. कॅफेच्या आडमध्ये हुक्का पार्लर चालवला जात असल्याचं या छाप्या दरम्यान उघड झालं आहे.
चस्का कॅफेवर अनेक जण हुक्का पीत असल्याचं दिसून आलं. ही कारवाई पहाटे दोन वाजेर्पयत सुरु होती. पोलिसानी छापा टाकून कोणीही आत अथवा बाहेर जाऊ नये यासाठी कॅफे सील केला होता.
पोलिसांनी जवळपास 70 जणांना त्याच ठिकाणी नोटिसा दिल्या आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस कारवाई केली जाणार आहे.
कॅफे चालक मालक आणि वेटर यांच्या विरोधातही ही कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांनी कॅफेतील सगळे हुक्का साहित्य जप्त केले आहे.
थोडक्यात बातम्या-
पुण्यातील रात्रीच्या संचारबंदीत बदल; आता संचारबंदी नव्हे तर…
बापटांनी घेतली पाटलांची फिरकी; पाटील म्हणाले… तर माझेच बारा वाजतील!
विराट कोहली नाही तर ‘हा’ ठरलाय सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू
“चंद्रकात पाटील म्हणजे चंपारण्यातील पात्र”
काँग्रेसची मोठी घोषणा; ही निवडणूक स्वतंत्र लढणार