Police Recruitment 2024 | महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात या डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा पोलीस होणार आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यात तब्बल 35 हजार पोलीसांची भरती झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा भरती केली जाणार आहे. तरुण-तरुणींसाठी ही मोठी संधी असणार आहे. (Police Recruitment 2024 )
राज्यात 2022-2023 मध्ये पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे. यात राज्यात एकूण साडे सात हजार पदे तर फक्त मुंबईत तब्बल बाराशे पदे भरली जाणार आहेत.
राज्यात साडेसात हजार पदे भरली जाणार
राज्यात लवकरात लवकर सध्याची 14 हजार 471 पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते. आतापर्यंत 25 जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे.(Police Recruitment 2024 )
बाकी जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याचबरोबर पावसामुळे मुंबई पोलीसांना मैदाने न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया उशीराने सुरू झाली. आता ही भरती देखील लवकरात लवकर संपवण्यात येणार आहे. यानंतर डिसेंबर महिन्यात नवीन पोलीस भरती होणार आहे.
मुंबईत बाराशे पदे भरली जाणार-
मागच्या वर्षी मुंबईत 8 हजार पदांची भरती झाली होती. यामधील बहुतांश पोलीस त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून सप्टेंबरमध्ये पोलीस दलात दाखल होणार आहेत. मुंबईत 4,230 पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी पोलीसांकडे 5 लाख 69 हजार अर्ज आले आहेत. त्यापैकी दोन हजार 572 पोलीस हवालदार, 917 चालक, 717 तुरुंग हवालदार आणि 24 बँड्समन पदांसाठी अर्ज करण्यात आले आहेत. याशिवाय मुंबई (Police Recruitment 2024 )पोलीस दलाला आणखी 1200 कर्मचाऱ्यांची गरज असल्याने सप्टेंबर महिन्यात पुन्हा भरती होणार आहे.
News Title – Police Recruitment 2024 in December
महत्त्वाच्या बातम्या-
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल?, जाणून घ्या तुमचे राशी भविष्य
सावधान! झपाट्याने पसरतोय मंकीपॉक्स आजार; जाणून घ्या लक्षणं
… तर फडणवीस राजकारणातून निवृत्त होणार? पदाचा राजीनामा देणार
केस मजबूत करण्यासाठी या तेलाचा वापर करा, अवघ्या काही दिवसांत होईल प्रभाव
व्यक्तीकडे ‘या’ तीन गोष्टी नसतील तर पैसा, सौंदर्य सगळंच व्यर्थ!