बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात डिसेंबरपर्यंत पोलिस भरती; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मोठी घोषणा

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं समोर आलं होतं. मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी पोलिस भरतीच्या तसेच अन्य परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने मराठा समाजासाठी आणि पद भरतीसाठी मध्यस्त मार्ग काढला होता. त्यानंतर आता राज्यात लवकरच पोलिस भरती केली जाणार आहे.

डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. तर पोलीस सेवेत कर्मचारी दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचारी किमान पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हावा, त्यासाठी योजना बनविण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

एमपीएससीचा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी एमपीएससी सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलै अखेरपर्यंत भरणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं. तर सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलीस आदी महत्त्वाच्या विभागांमध्ये सर्व पदांची भरती प्रक्रिया वेगानं सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर आता गृहमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे 2018 ते 2020 या तीन वर्षांत 1533 पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमधून अद्याप एकाही उमेदवाराला नियुक्ती मिळाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सूरज गुज्जलवार यांच्या काढलेल्या माहितीतून ही बाब स्पष्ट झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

अर्धांगवायूचा झटका आला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका – अमोल मिटकरी

12 ते 18 वयोगटातील मुलांना मिळणार कोरोना लस; नोंदणीला झाली सुरुवात

कोरोना झाल्यानंतर पडतंय टक्कल? वाचा लाँग कोविडचे साईडइफेक्ट

मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; विरोधी पक्ष नेत्यांनी केलं स्पष्ट

“मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज पंकजाताई आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More