बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोलीस भरती पदासाठी तब्बल ‘इतक्या’ हजार जागा, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई | महाराष्ट्र पोलीसात (Maharashtra Police) भरती होण्याची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पोलीस भरती 2019 मधील रिक्त असलेल्या 5 हजार 297 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या काही दिवसांत निवडलेल्या उमेदवारांची नेमणूक करण्यात येणार आहे.

पोलीस भरती 2019 मधील पदांशिवाय 7 हजार 231 पदांवर पोलीस भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी अधिवेशनादरम्यान केली आहे. मंत्रीमंडळाने या भरतीला परवानगी दिली असून कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असं आश्वासन देखील वळसे-पाटलांनी दिलं आहे.

पोलीस ठाण्यांच्या इमारतीची सुधारणा करण्याचा निर्णय देखील गृहमंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पामधील 87 पोलीस ठाण्यांची बांधकामे हाती घेतली असून यावर्षी पोलिसांच्या निवासस्थानाची देखील भरीव तरतूद केली आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्य राखीव दलातील अंमलदारांना पोलीस दलात जाण्यासाठी 15 वर्षांची अट होती. ही अट आता 12 वर्षांवर केली असल्याचंही गृहमंत्री म्हणाले. तर गृहरक्षक दलाच्या जवानांना वर्षभरात 120 ते 150 दिवस काम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवल्याची माहिती वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली.

थोडक्यात बातम्या-

“रोहित माझा कॅप्टन नाही, विराट कोहलीला कॅप्टन बनवा”

देव तारी त्याला कोण मारी ,मृत्युच्या दाढेतून वाचले महिलेचे प्राण, पाहा व्हिडीओ

‘पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच’; नाना पटोलेंच्या नव्या दाव्यानं खळबळ

धक्कादायक ! कोरोनाच्या ‘या’ नव्या व्हेरियंटनं टेंशन वाढवलं

“आम्ही बोललो की शरद पवारांचे चमचे आहेत, हे काल पक्षात आलेले…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More