वनराज आंदेकर हत्या प्रकरणात पोलिसांना संशय, मोठी माहिती समोर

Vanraj Andekar | पुण्यातील नाना पेठेत रविवारी पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांचा मृत्यू झाला. वनराज आंदेकर यांच्यावर 5 राऊंड फायर करण्यात आले. तसेच हल्लेखोरांनी कोयत्याने देखील वार केले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात पोलिसांना संशय

वनराज आंदेकर (Vanraj Andekar) याची हत्या घरगुती वादातून किंवा वर्चस्वाच्या लढाईतून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. वनराज आंदेकर याची हत्या रात्री नाना पेठेतील डोके तालीम परिसरात साडे आठच्या वेळी घडली.

हल्ला झाला त्यावेळी डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर एकटाच तिथे उपस्थित होता. हा हल्ला होण्यापूर्वी परिसरातील लाईट देखील गेली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वनराज आंदेकरला केईम रुग्णालयात दाखल केलं, तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं.

पुणे शहरात खळबळ

या घटनेमुळं पुणे शहरात खळबळ उडाली आहे. नाना पेठेतील डोके तालीम परिसरात ही घटना घडली. वनराज आंदेकर 2017 ला रास्ता पेठ, रविवार पेठ वार्ड येथून नगरसेवक झाला होता.

वनराज आंदेकर याचे वडील बंडू आंदेकरांची टोळी पुण्यातील जुन्या टोळींपैकी एक आहे. आंदेकर टोळी आणि माळवदकर या दोन्ही टोळ्यांमध्ये संघर्ष झाला होता. या टोळीयुद्धातून प्रमोद माळवदकर याचा खून झाला होता. त्या प्रकरणात बंडू आंदेकर याला जन्मठेप झाली होती.

दरम्यान, आंदेकर टोळीचा पुण्यातील नाना पेठ परिसरावर प्रभाव होता. गेल्या काही दिवसांपासून आंदेकर टोळीचा प्रभाव कमी होत असल्याच्या चर्चा होत्या.

महत्त्वाच्या बातम्या- 

विधानसभा तोंडावर असतानाच अजित पवारांच्या अडचणीत वाढ!

माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर!

ऐन सणासुदीत महागाईचा भडक, भाजीपाल्याचे दर पोहोचले शंभरी पार

लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर आले की नाही? अशाप्रकारे चेक करा

महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, आजही धो-धो बरसणार; ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट