प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणारा शेतकरी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणाऱ्या विजय जाधव या शेतकऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. विजय जाधव आज विधीमंडळाच्या प्रवेशद्वारावर निदर्शनं करणार होते, त्यापू्र्वी पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आझाद मैदानात त्यांना नेण्यात आलंय, याठिकाणी त्यांनी निदर्शन सुरु ठेवलंय. दरम्यान, शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात विजय जाधव यांनी हातात अस्थीकलश घेऊन भाषण केलं होतं. 

पाहा विजय जाधव यांचं भाषण-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या