रिक्षाचालकाची मुजोरी; पोलिस महिलेला फरफटत नेलं

मुंबई | रिक्षाचालकाकडे लायसन्स मागणाऱ्या महिला वाहतूक पोलिसाला रिक्षाचालकाने फरफटत नेलं.  कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली.

आशा गावंड असं या महिला पोलिसाचे नाव आहे. त्या मंगळवारी रेल्वे स्थानक परिसरात वाहतुकीचं काम पाहत होत्या. 

तेव्हा रिक्षाचालक नागेश अवालगिरी याला थांबवत गावंड यांनी लायसन्स मागितले. त्यावर घाबरलेल्या नागेशने रिक्षा भरधाव वेगात पुढे नेली. गावंड यांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. पण रिक्षाच्या वेगामुळे त्या रिक्षासोबत फरफटत गेल्या.

हे पाहूनही नागेशने रिक्षा थांबवली नाही. त्यामुळे तेथील नागरिकांनी नागेशला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-गद्दारांना माफी नाही; उदयनराजेंच्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्तासाठी ही लढाई आहे!

-बलात्कार पीडित मायलेकींची गृह राज्यमंत्र्यांच्याच विरोधात तक्रार

-मोदी सरकारमधील मंत्र्यावर 6 महिला पत्रकाराचे लैंगिक अत्याचाराचे आरोप!

-मुंडेंची धडक कारवाई; आरतीसाठी गेले अन् थेट कारवाईच करून आले

-कोण कोणाला आडवं करतंय ते येणाऱ्या निवडणुकीतच बघू- उदयनराजे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या