बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांना मिळणार एवढी सूट; नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

नवी दिल्ली | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. नुकतेच स्वेच्छेने आपली जुनी गाडी स्क्रॅप करण्याचे धोरण केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आलं. आता जुनी गाडी स्क्रॅप केल्यानंतर नव्या कारवर घसघशीत सूट मिळणार आहे.

वाहनांना स्वइच्छेने जो व्यक्ती स्क्रॅप करेल त्याला नवीन गाडी खरेदी करत असताना वाहन कंपन्या पाच टक्के अतिरिक्त सूट देतील. अशी घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केली आहे. पंधरा वर्षापुर्वीच्या जुन्या गाड्या हद्दपार करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. ज्यामुळे प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होईल.

नवीन स्क्रॅप धोरणात चार घटक ठेवण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर हरित कर आणि इतर शुल्क आकारण्यात येईल. तसेच, फिटनेस आणि पीयूसी प्रमाणपत्र घेणं बंधनकारक असेल. त्यासाठी देशात सेल्फ ड्राईव्ह फिटनेस केंद्र उभारण्याच्या दिशेने केंद्र सरकारचं काम सुरू असल्याचं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे.

सेल्फ ड्राईव्ह फिटनेस केंद्रामध्ये जर वाहन उत्तीर्ण नाही होऊ शकलं तर त्यांच्याकडून दंड आकारण्यात येणार आहे. वाहन क्षेत्रांमध्ये हे धोरण क्रांती घडवून आणेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

कर्नाटकमधील मंत्र्याच्या SEX CD प्रकरणात आला हा मोठा ट्विस्ट!

कामगारांच्या मुलांचा शिक्षणापासून लग्नापर्यंतचा खर्च सरकार करणार; सरकारकडून ही योजना लागू

जागतिक महिला दिनानिमित्त गुगलकडून महिलांना अनोेखी भेट; पाहा व्हिडिओ

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला राज ठाकरेंची चिंता; पत्राद्वारे केली मास्क घालण्याची विनंती

ऑनलाईन सत्र सुरू असताना वकिलाचा कॅमेरा ऑन राहिला अन्…, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More