अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे…; मुस्लिम युवकाने केला जेजुरीच्या खंडोबाला नवस

अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे…; मुस्लिम युवकाने केला जेजुरीच्या खंडोबाला नवस

नाशिक | लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना महाराष्ट्रातील एका तरूणाला विधानसभेची ओढ लागली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे, असा नवस जेजुरीच्या खंडोबाला नाशिकच्या एका मुस्लिम युवकाने केला आहे.

निफाड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार दिलीप बनकरांचा अगदी थोड्याश्या मतांनी पराभव झाला होता. ही बाब त्याच्या मनात 5 वर्षांपासून मनात सलत असल्याने त्याने बनकरांबरोबर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विरजमान व्हावे, असं साकडं त्याने जेजुरीच्या खंडेरायाला घातलंय.

लोकसभा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. त्या निकालावर महाराष्ट्रातील बहुतेक राजकीय समिकरणे अवलंबून असणार आहेत.

दरम्यान, जेजुरीचा खंडोबा युवकाला पावतो का? हे येणारा काळच ठरवेल.

महत्वाच्या बातम्या

-हिमालयात काहीतरी विशेष आहे; नरेंद्र मोदींनी पोस्ट केले आणखी काही फोटो

-नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार की नव्या चेहऱ्याला मिळणार संधी?

-नवज्योत सिद्धूंना माझ्याजागी मुख्यमंत्री व्हायचं आहे- पंजाबचे मुख्यमंत्री

-“रावसाहेब दानवेंनी आपल्या लायकीनुसार काम करावं”

पश्चिम बंगालमध्ये बाबुल सुप्रियो यांना तृणमूल समर्थकांचा घातला घेराव

Google+ Linkedin