बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महापौर निवडणुकीआधीच जळगाव महानगरपालिकेमध्ये राजकीय भूकंप?

जळगाव | जळगाव शहर महानगरपालिकेत लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिकेवर लवकरच भगवा फडकणार असे भाकीत शिवसेना नगरसेवक आणि नेत्यांनी व्यक्त केले आहे. जळगाव जिल्ह्यातील मातब्बर नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर जळगाव जिल्ह्यात राजकीय हालचाल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्याचे परिणाम आता जळगाव शहर महानगर पालिकेत दिसण्याची शक्यता आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेत सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. विद्यमान महापौर भारती सोनवणे आणि उपमहापौर सुनिल खडके यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपमधील इच्छुकांनी वरिष्ठांकडे लॉबिंग सुरू केली आहे. महापालिकेत  भाजपचे बहुमत असल्यामुळे भाजपचा महापौर होऊ शकतो. परंतु भाजपमधील काही नाराज नगरसेवकांचा गट रविवार पासून संपर्कात नसल्याने वरिष्ठांचे टेन्शन चांगलचं वाढलं आहे.

भाजप आमदार गिरिश महाजन यांची महापालिकेत पकड असल्याचे बोलले जात होते. मात्र, एकनाथ खडसेंच्या  राष्ट्रवादी प्रवेशानंतर शहरातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

दरम्यान, संपर्कात नसलेले भाजप नगरसेवक शिवसेनेच्या गोटात जाण्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. असे झाल्यास महापालिकेवर शिवसेनेचा महापौर होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजपतील 27 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते आहे. जिल्ह्यातील बड्या शिवसेना नेत्याच्या निवासस्थानावर हा प्लॅन ठरल्याचे बोलले जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन

महागाईचा कहर! आता खाद्यतेलाच्या किंमती तब्बल ‘इतक्या’ टक्यांनी वाढल्या

भाजपच्या या आमदाराने योगी आदित्यनाथांसोबत केली छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना; म्हणाले

राज्यात मोठ्या राजकीय घडीमोडी सुरु, शरद पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक

पुढील दोन दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या कारण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More