बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राज्यकर्ते काय लायकीचे आहेत हे…’; राजू शेट्टींची जहरी टीका

पुणे | बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. ड्रग्ज प्रकरणावरून राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राज्यात राजकीय नेत्यांचे टोळीयुद्ध सुरू झालं आहे. यातून एकमेकांचे कपडे उतरविण्याचं काम सुरू आहे. जनताही यांची मजा घेतेय, अशी बोचरी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. चाललंय ते चांगलं चाललंय, असंही राजूू शेट्टी म्हणाले आहेत.

आम्ही मत देऊन ज्यांच्या ताब्यात राज्याचा कारभार दिलाय ते काय लायकीचे आहेत. हेच या टोळीयुद्धातून राज्यातील जनतेला कळायला लागलयं. आज महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने अडचणीत आहे. त्या शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. या परिस्थितीत कष्टकऱ्यांच्या मागे ना विरोधीपक्ष ना सत्ताधारी उभे राहतात, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला आहे.

दरम्यान, मुलभूत प्रश्नांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी एकमेकांवर आरोप करत राजकीय टोळीयुद्ध सुरू आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. जोपर्यंत जनता खुळी आहे आणि केलेल्या आरोपात रस आहे. तोपर्यंत हे ड्रग्ज प्रकरण सुरू राहणार आहे, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘तुमच्यात जर ऐवढी हिंमत असेल तर स्वत:च्या…’; राम कदम आक्रमक

‘मला ईडीचा समन्स आला तेव्हा…’; व्हिडीओ शेअर करत अनिल देशमुखांनी दिलं स्पष्टीकरण

“ठरल्याप्रमाणे झालं असतं तर मी फोटोग्राफी केली असती आणि तुम्हाला…”

“हमाम में सब नंगे है कारण, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…”

नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालाय- प्रविण दरेकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More