बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आजारी असतानाही खडसे चौकशीसाठी हजर, म्हणाले ‘चौकशी मागे राजकीय हेतू आहे’

मुंबई | दोन दिवसांपुर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली होती. मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंतर गिरीश चौधरींना अटक करण्यात आली आहे. तर एकनाथ खडसे यांना देखील बुधवारी ईडीची नोटीस आली आहे. त्यानंतर आता एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत.

एकनाथ खडसे यांची तब्येत बिघडल्यानं त्यांची आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. राष्ट्रवादीकडून याबद्दलची माहिती देण्यात आली होती. पत्रकार परिषद रद्द केल्यानं ते ईडीच्या चौकशीसाठी जाणार की नाही, अशी सवाल उपस्थित केला जात होता. मात्र , त्यांनी अचानकपणे ईडीच्या कार्यालयात हजेरी लावल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ईडीच्या चौकशीला जाण्याआधी त्यांनी गंभीर आरोप देखील केले आहेत.

ईडी चौकशी मागे राजकीय हेतू आहे असे खडसेंनी म्हंटल आहे. मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर ही प्रक्रिया सुरु झाली असून मला यामागे कुठेतरी राजकीय वास येत आहे. राजकीय हेतूने कोणीतरी हे सर्व करत आहे पण जे काही असेल ते उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. कोणत्याही चौकशीला सामोरे जायला मी तयार आहे, सक्षम आहे , अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी केली आहे.

दरम्यान, भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जमीन खडसेंच्या पत्नी आणि जावई यांनी अब्बास उकानी या व्यक्तींकडून 3 कोटी 75 लाख रूपयांना खरेदी केली होती. सदरील जमिनीचे 37 लाख एवढे मुद्रांक शुल्कही भरण्यात आले होते. सर्व प्रक्रियेनंतर ही जमिन भोसरी एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं पुढे आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“एका चांगल्या व्यक्तीला बळीचा बकरा बनवण्यात आलं, बिचारे डॉ. हर्षवर्धन…”

मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर रजेवर; प्रभारी अध्यक्ष म्हणून केली ‘या’ व्यक्तीची नेमणूक

राज्यात पावसाचं कमबॅक! ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तर…’; अभ्यासातून महत्वाची माहिती आली समोर

“दिलीप कुमार नसलेली चित्रपटसृष्टी म्हणजे नेहरु-गांधी, ठाकरे नसलेलं राजकारण”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More