बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राजकारण्यांनी तुमच्या हातात बंदुका दिल्या, हिंमत असेल तर…’; ‘त्या’ मुलीचं दहशतवाद्यांना खुलं आव्हान

नवी दिल्ली | गेल्या काही वर्षापासून जम्मू-काश्मीर सीमेवर दहशतवाद्याकडून करण्यात येणाऱ्या कारवायांच्या घटनांनामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. श्रीनगरचे प्रसिद्ध फर्मासिस्ट माखनलाल बिंद्रू यांची श्रीनगरमधील त्यांच्या बिंद्रू मेडिकल दुकानावर दहशतवाद्यांनी मंगळवारी गोळ्या झाल्या. त्यानंतर त्यांची मुलगी श्रद्धा बिंद्रुने दहशतवाद्यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे सध्या श्रद्धा बिंद्रूचं सर्वत्र कौतूक होत आहे

माझे वडील जरी मरण पावले असेल तरी त्यांचा आत्मा सदैव जिवंत राहिल. माझे वडील एक सेनानी होते आणि ते नेहमी म्हणायचे की, माझ्या पायात बुटांसह मी मरणार. तुम्ही एका व्यक्तीला मारू शकता, परंतु तुम्ही माखनलालच्या आत्म्याला मारू शकत नाही. ज्याने माझ्या वडिलांना गोळ्या घातल्या आहेत, त्याने माझ्या समोर यावं. माझ्या वडिलांनी मला शिक्षण दिलं आहे, तर राजकारण्यांनी तुमच्या हातात बंदुका आणि दगड दिले आहेत. सर्व राजकारणी तुमचा वापर करत आहेत, या आणि शिक्षणाने लढा द्या,असं श्रद्धा बिंद्रू म्हणाली आहे.

माझ्या वडिलांनी सायकलवरून कामाला सुरूवात केली. माझा भाऊ एक प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ आहे. माझी आई मेडिकलमध्ये बसते. आम्ही आज जे आहोत ते आम्हाला माखनलाल बिंद्रूंनी बनवले आहे. माझे वडील एक काश्मिरी पंडीत होते, ते कधीही मरणार नाही. हिंदू असूनही मी कुराण वाचलं आहे. कुराण म्हणते की तुम्ही शरीराला मारू शकता, आत्मा जिवंत राहू शकतो, असंही श्रद्धा बिंद्रूने म्हटलं आहे.

दरम्यान, माखनलाल बिंद्रू श्रीनगरमधील एक प्रसिद्ध केमिस्ट असून ते गेल्या अनेक दशकांपासून औषध वितरित करत होते. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांच्यावर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

पाहा व्हिडीओ 

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! काॅंग्रेस नेते सचिन पायलट पोलिसांच्या ताब्यात; उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई

“महाराष्ट्र सरकारची मती कुठे गेली? ड्रगमाफिया तुमचे घरजावई आहेत का?”

“एनसीबीचं नाव काढलं की नवाब मलिकांच्या पोटात का दुखतं?”

आयपीएलमध्ये खेळायची संधी सांगून अनेकांना फसवणूक; अनेक मोठी नावं बाहेर येण्याची शक्यता

”आज देवेंद्र फडणवीसांच्या मेहनतीचा अन् उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल लागला”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More