Top News मनोरंजन राजकारण

काँग्रेस आणि भाजपकडून मला ऑफर होती- कंगणा राणावत

मुंबई | सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगणा राणावतने घराणेशाहीचा मुद्दा उचलून धरला होता. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये इतरांपेक्षा स्टार किड्सला जास्त संधी देण्यात येते अशी टीकाही तिने केली होती. यापूर्वीही कंगणा तिच्या परखड मतांमुळे चर्चेत होती. दरम्यान पुन्हा एका मुद्द्यावरून कंगणा चर्चेत आली आहे.

काही दिवसांपूर्वी कंगणा राणावतने नरेंद्र मोदींचं समर्थन केलं होतं. त्यावेळी तिला सोशल मिडियावरही ट्रोल करण्यात आलं. मात्र या सर्वांना प्रत्युत्तर देताना म्हणाली, “की अनेकांना असं वाटतंय की मला राजकारणात यायचं आहे म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत आहे. यामुळे मला ट्रोल करण्यात आलं. मात्र या सर्वांना मला सांगायचं आहे की, माझे आजोबा 15 वर्ष काँग्रेसचे आमदार होते.”

कंगणाच्या अधिकृत टीमने यासंदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये म्हटलंय की, “राजकारणामध्ये माझं घराणं फार नावाजलेलं आहे. गँगस्टर चित्रपटानंतर मला काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली होती. इतकंच नाही तर मणिकर्णिकानंतर मला भाजपकडूनंही तिकीट मिळत होतं. मात्र माझं माझ्या कामावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे मी राजकारणात जाण्याचा विचार करत नाही.”

पंतप्रधान मोदींचं समर्थन केल्यानंतर कंगणाला राजकारणात जाण्याची इच्छा आहे अशा अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. यासंदर्भात कंगणाला सोशल मिडीयावर ट्रोलही करण्यात आलं. मात्र कंगणाने राजकारणात जाण्याची इच्छ नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘ही’ भारतीय कंपनी खरेदी करू शकते टिकटॉक

पवार कुटुंबातील प्रश्न एका मिनिटात सुटेल- राजेश टोपे

कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या जीवनावर येणार वेबसिरीज

देशात मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलणार; पंतप्रधान मोदींकडून संकेत

“देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्ष गृहखातं सांभाळूनही….”; मुश्रीफांचा फडणवीसांना सणसणीत टोला

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या