बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“त्यांचं वाटोळं करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही?”

मुंबई | शिक्षक पात्रता परीक्षेत म्हणजेच टीईटी (TET) परीक्षेत घोटाळा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी छापेमारी करत आरोपी तुकाराम सुपे (Tukaram Supe) याच्याकडून दीड कोटींची रोकड हस्तगत केली आहे. त्यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जहरी टीका केली आहे.

एकीकडे परीक्षांमध्ये घोळ करायचा आणि दुसरीकडे कोट्यवधींची संपत्ती जमा करायची. तुकाराम सुपे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारचा वरदहस्त असल्याशिवाय तरी हे शक्य होणार नाही. लाखो मुलांच्या आयुष्यासोबत खेळताना, त्यांच्या भविष्याचं वाटोळं करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही?, असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत आणि हे लोकं लुटारू सत्ताधाऱ्यांसोबत मिळून आपले खिसे भरत सुटले आहेत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून महाविकास आघाडी सरकार अनेक विभागात पैसे खात सुटलं आहे. यांना भस्म्या झाला आहे का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलाय.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. टीईटी परीक्षेचा पेपरफुटीनंतर आता पोलिस भरती परीक्षेतीत घोटाळा बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता विरोधक आक्रमक झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“…त्यावेळी माझ्या बापाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही”

वेळीच ओळखा Omicron; ‘ही’ लक्षणं असतील तर लगेच टेस्ट करा!

अल्लु अर्जून आणि रश्मिकाच्या ‘पुष्पा’चा चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ, केली ‘इतक्या’ कोटी रुपयांची कमाई

‘आमदार झाला, मंत्री झाला, पण जीव मात्र अजूनही …’ किशोरी पेडणेकरांचा शेलारांना टोला

धक्कादायक! गुजरातमधून 400 कोटींचे हेराॅइन जप्त, 6 पाकड्यांना पकडलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More