बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कर्जतचं राजकारण तापलं! ‘शरद पवारांचा वारसा असूनही…’, चंद्रकांत पाटलांचा टोला

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून कर्जतचं (Karjat) राजकारण तापलेलं दिसत आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यातच नगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात आता राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपने (BJP) जोरदार तयारी केली आहे. त्यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

“कर्जत नगरपंचायत निवडणुकीत ऐनवेळी भाजपा उमेदवाराचा पाठिंबा मिळवण्याची वेळ राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यावर आली आहे. हा रोहित पवारांचा निवडणुकीपूर्वीच झालेला पराभव आहे. शरद पवारांचा वारसा ,राज्यात सत्ता, अजित पवार उपमुख्यमंत्री असूनही रोहित पवार यांना एकेका जागेसाठी झुंजावे लागतंय”, अशी टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

“याचाच अर्थ असा होतो की जनता भाजपासोबत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे. सत्तेचा दुरूपयोग आणि धनशक्ती विरोधात असली तरी जनशक्ती आपल्याकडे असल्याने राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार संघर्ष करा”, असं आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

दरम्यान, राम शिंदे यांनी सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांना धमकवलं जात असल्याचा आरोप केला आहे. कर्जत नगरपंचायतीत अनेकांना धमकवून अर्ज मागे घेण्यास सांगितलं जातंय, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे आता कर्जतमधील वातावरण तापलेलं दिसतंय.

थोडक्यात बातम्या-

आनंदाची बातमी! सीरमच्या ‘कोवोवॅक्स’ लसीला WHO ची मान्यता

सरकारचा मोठा निर्णय! MPSCच्या ‘त्या’ उमेदवारांना मिळणार आणखी एक विशेष संधी

“चंद्रकांत पाटील म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला व्हायरस”

“12 खात्याच्या मंत्र्यांना थेट आव्हान देऊन तुम्ही…”, धनंजय मुंडेंनी केलं रोहित पवारांचं कौतुक

सुकेश चंद्रशेखरचं नवं कनेक्शन! बाॅलिवूडमधील 12 अभिनेत्रींची नावं समोर आल्यानं खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More