बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“12 खात्याच्या मंत्र्यांना थेट आव्हान देऊन तुम्ही…”, धनंजय मुंडेंनी केलं रोहित पवारांचं कौतुक

अहमदनगर | सध्या संपूर्ण राज्यभरात नगरपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यातच नगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आज महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी रोहित पवारांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

बारा खात्याच्या मंत्र्यांना थेट आव्हान देऊन भाजपच्या किल्ल्यात तुम्ही आमदार झालात, असं म्हणत त्यांनी रोहित पवार यांचं कौतुक देखील केलं आहे. आमदार रोहित पवार यांनी आमदार झाल्यानंतर गेल्या फक्त दोन वर्षात वीस वर्षांचा खड्डा पूर्ण केला, असं देखील धनंजय मुंडे यांनी बोलताना म्हटलं आहे.

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेमध्ये बोलत असताना धनंजय मुंडे यांनी भाजपवर शरसंधान साधलं. तसेच ईडी या तपास यंत्रणेची तुलना थेट मजूर बीडीशी करत धनंजय मुंडे यांनी केंद्रीय तपास यंत्रणेची अक्षरश: खिल्ली उडवली. मजूर बिडीची किंमतही ईडी पेक्षा जास्त असल्याचं म्हणत ईडीची चव गेली असल्याचे धनंजय मुंडे यांनी भर सभेत बोलून दाखवलं आहे.

दम्यान, यावेळी बोलत असताना भाजप नेत्यांचा उल्लेख धनंजय मुंडे यांनी बांडगुळ असा करत ओबीसी आरक्षणावरूनही भाजपवर निशाणा साधला आणि पूर्ण तपास तुमच्या कार्यकाळात झाला फक्त निकाल महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर लागला त्यात आमचा काय दोष? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

सुकेश चंद्रशेखरचं नवं कनेक्शन! बाॅलिवूडमधील 12 अभिनेत्रींची नावं समोर आल्यानं खळबळ

…अन् भर कार्यक्रमात भाजप खासदाराने पैलवानाच्या कानशिलात लगावली

“ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर राज्यात Pandemic Act लागू करा”

भारताचं टेन्शन वाढलं! ओमिक्राॅनचं शतक पुर्ण, केंद्र सरकारने दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

“अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते”, निलेश राणेंच्या दाव्याने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More