बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर गुलाबराव पाटलांनी मागितली माफी, म्हणाले…

मुंबई | जळगावमधील एका प्रचारसभेत शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. गुलाबराव पाटील यांनी खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांचं नाव वापरत करून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून सर्व स्तरातून गुलाबराव पाटील यांच्यावर टीका होत होती. अशातच गुलाबराव पाटलांनी माफी मागितली आहे.

माझ्या मतदारसंघातील रस्ते हे हेमा मालिनीच्या (Hema Malini) गालासारखे बनवले असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलं होतं. इथले रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत. जर रस्ते तसे नसतील तर राजीनामा देऊन टाकेन, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. त्यावरून चांगलाच वाद पेटला होता.

वाद पेटलेला दिसत असताना गुलाबराव पाटील यांनी माफी मागितली आहे. माझ्या भाषणातील वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. भाजपकडून विरोध होत असताना महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीकडून देखील गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा निषेध होत होता.

दरम्यान, राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी देखील त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी माफी मागितली आहे.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे ठरलं होतं, पण ऐनवेळी…”

“हा छत्रपतींचा महाराष्ट्र, अंगाशी खेटू नका नाहीतर गाठ आमच्याशी आहे”

राज्यात कडाक्याची थंडी! येत्या 2 दिवसात तापमानाचा पारा आणखी घसरणार

“हिंमत असेल तर राजीनामा आणि मैदानात या”, अमित शहांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

आरारारा खतरनाक! पाणीपुरीत कोणी मिरिंडा घालतं का?; पाहा भन्नाट व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More