बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते”, निलेश राणेंच्या दाव्याने खळबळ

मुंबई | गत काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणांची महाराष्ट्रातील कारवाई वाढली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप (BJP) महाविकास आघाडी सरकारला (MVA Government) त्रास देण्याचं काम करत असल्याची टीका महाविकास आघाडीकडून भाजपवर केली जाते. अशातच भाजप नेते निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांच्याबाबत एक खळबळ माजवणारा दावा केला आहे.

ईडीनं काही दिवसांपूर्वी राज्यभरात अजित पवार यांच्या नातेवाईकांवर कारवाई केली होती. अजित पवार यांच्या बहिणी आणि मुलांच्या कार्यालयांवर कारवाई करण्यात आली होती. अजित पवार यांच्यावर बॅंक घोटाळ्याचा आरोप निलेश रांणे यानी केला आहे. लवकरच अजित पवार यांना अटक होण्याची शक्यता आहे, असं खळबळजनक वक्तव्य निलेश राणे यांनी केलं आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरून राजकारण तापलेलं आहे. अजित पवार यांनी सत्ता न येण्याच्या भीतीनं जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली आहे. जेव्हा निवडणूक होईल तेव्हाही आमची सत्ता येणार आहे. अजित पवार हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. परिणामी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे, अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान, निलेश राणे यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारण तापलेलं आहे. निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर करावाईचे संकेत दिले आहेत. परिणामी आता भाजप आणि राष्ट्रावादीमधील वाद वाढण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

झुनझुनवालांना जोर का झटका! ‘या’ शेअर्समुळे फक्त 10 मिनिटात गमावले 318 कोटी

‘भाजप आणि ममता बॅनर्जी मिळून…’; RSS च्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

जय शहांचा ‘तो’ फोटो तुफान व्हायरल; दिग्गजांनी केली सडकून टीका

नाथाभाऊंनी केला भाजपचा करेक्ट कार्यक्रम; तब्बल 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“कदाचित मी पहिलाच मंत्री असेल ज्याने…”, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More