बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवाजी पार्कवरून काका पुतण्या आमने-सामने; वाचा काय आहे प्रकरण

मुंबई | शिवाजी पार्कवरून शिवसेना आणि मनसे आमने-सामने आली आहे. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क नूतनीकरण प्रकल्पात मनसेने उडी घेतली आहे. तसेच आता शिवसेना या प्रकल्पासाठी निविदा काढण्याची घाई करताना दिसत आहे.

शिवाजी पार्कवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. एकीकडे मनसेने मुंबईचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र लिहलं आहे. त्या पत्रात छत्रपती शिवाजी पार्कच्या नुतनीकरणासाठी सीएसआर फंडाची मदत घेऊन मनसे काम करेल, असं म्हटलं आहे.

दुसरीकडे आदित्य ठाकरे सुद्धा गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी पार्कच्या कामात लक्ष घालत आहेत. तर राज ठाकरे यांनीही छत्रपती शिवाजी पार्कला भेट देऊन पाहणी केली आहे.

आम्ही छत्रपती शिवाजी पार्कात सीएसआर निधीच्या माध्यमातून रेन वाॅटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू केला होता. पण 2017 मध्ये हा प्रकल्प बंद पडला. आता महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. आम्हाला सीएसआर निधीतून छत्रपती शिवाजी पार्कचं नुतनीकरण करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मनसे पत्राद्वारे केली आहे. मात्र असं कोणतंही पत्र मिळालं नसल्याचं आयुक्त चहल यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोदी आता सरदार पटेल यांच्यापेक्षाही मोठे वाटू लागले आहेत- संजय राऊत

…म्हणून हृतिक रोशनने 75 कोटींची ती ऑफर धुडकावली!

‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षीतने शेअर केले ग्लॅमरस फोटो; फोटो पाहून चाहते झाले फिदा

तृप्ती देसाई यांचे संजय राठोड यांना खुले पत्र, वाचा जसेच्या तसे

‘PI लगडला चालवणारा बाप कोण ते आम्ही शोधून काढू’; चित्रा वाघ आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More