बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजकारण तापलं: महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन राणा दाम्पत्यांची सरकारविरोधात घोषणाबाजी

अमरावती | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा हटवण्यावरुन अमरावतीमध्ये राजकारण पेटलं आहे. चार दिवसांपूर्वी मध्यरात्री विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. आज पहाटे राजापेठ उड्डाणपूलावरील पुतळा पोलीस बंदोबस्तात हटवला. अमरावतीतला हा हायव्होल्टेज ड्रामा सध्या राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेत आहे.

राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी विनापरवानगी आमदार रवी राणा यांनी हा पुतळा बसवला होता. विनापरवानगी बसवलेला हा पुतळा प्रशासनानं काढल्यानं आता खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या आहेत.

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी याविषयी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे राणा समर्थकांसह नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं आहे. सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन आता राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

दरम्यान, गेल्या तीन वर्षापासून नवनीत राणा पुतळा उभारण्यसाठी परवानगी मागत होत्या. मात्र त्यांना ही परवानगी मिळाली नाही. त्यानंतरही त्यांनी हा पुतळा उभारला.

थोडक्यात बातम्या – 

‘…कच्च्या गुरूचा चेला नाय मी’; महिलांसोबत गैरवर्तणाच्या आरोपांवर किरण मानेंची प्रतिक्रिया

किरण माने प्रकरण: “महिलांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून काढलं”

Omicron मधून बरं झाल्यानंतर शरिरात ‘इतका’ कालावधी अँटीबॉडीज राहतात, तज्ज्ञांचा इशारा

ऑनलाईन पिझ्झा मागवणं पडलं महागात, महिलेला बसला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा गंडा

‘या’ ठिकाणी मास्क घालण्यात हलगर्जीपणा, पोलिसांनी आकारला तब्बल एवढा दंड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More